आता पंकजा मुंडे यांचीही नाराजी, पालकमंत्री पदावरून म्हणाल्या…

आता पंकजा मुंडे यांचीही नाराजी, पालकमंत्री पदावरून म्हणाल्या…

Pankaja Munde

विशेष प्रतिनिधी

बीड : महायुतीतील पालक मंत्री पदाचा वाद शमयका तयार नाही. रायगड आणि नाशिक पालक मंत्री पदावरून शिंदे गटाच्या नाराजीमुळे दोन्ही जिल्ह्यांची पालक मंत्री पदे स्थगित ठेवली असताना आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि पशुसंवर्धन आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

बीडची मुलगी असल्याने मला बीडचे पालकमंत्री पद मिळालं असतं तर अजून आनंद झाला असता असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

बीड पालकमंत्री पद वादावर त्या म्हणाल्या, मी त्यावर अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मला जालना येथील पालकमंत्री पद मिळालं. त्या ठिकाणाहून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला मिळालेली संधी माझ्यासाठी अनुभव असं समजून मी घेत असते.

प्रत्येक वेळी तुम्हाला सारखं काम करायला मिळेल असं नाही तर मी पूर्वी पाच वर्ष कोणत्याही पदावर नसताना पूर्ण वेळ संघटनेचे काम केलं. पण मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचा पालकमंत्री पद मिळालं असतं तर बीडची सेवा करण्याची संधी मला मिळाली असती. तर अजुन आनंद झाला असता माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीड साठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिला आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, आता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीला जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जालन्यासोबत डबल लक्ष मला द्यावे लागेल, बीडचे पालकमंत्री अजित पवार आहे ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे

धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी शिबिरातील भाषणावर त्या म्हणाल्या, कोण कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर मी बोलू शकेलदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे आणि भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांना शिवसेना शिंदे गटाची नाराजी भोवली आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. रात्री उशिरा याबाबतचे आदेश कडण्यात आले. यामुळे पालकमंत्री पदावरून महायुतीत असलेला वाद समोर आला आहे

दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे १८ जानेवारी राजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं. काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नाही. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली होती. या दोघांनीही स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला.

Now Pankaja Munde is also displeased, from the position of guardian minister said

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023