विशेष प्रतिनिधी
नागपूर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठीू मनोज जरांगे पाटील आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने कडकडून विरोध केला आहे. त्यासाठी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. OBC Federation
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. यासाठी नागपूरमध्ये ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायडे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महासंघाची ही बैठक झाली. या बैठकीला ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.
ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून उद्यापासून राज्यभरात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाची भूमिका मांडली जाणार आहे. 30 तारखेला नागपूरमध्ये साखळी उपोषण केले जाणार आहे. तसेच ओबीसी समाज देखील येत्या 15 दिवसांमध्ये मुंबईकडे कूच करण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या विषयावरुन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. OBC Federation
दरम्यान, मनोज जरांगे यांचा लढा आरक्षणाचा नाही. हा लढा एक राजकी अजेंडा आहे. यात विरोधी पक्षांसह काही सत्ताधारी पक्षांच्याही नेत्यांचा समावेश आहे ओबीसी आरक्षण हे शासनकर्त्या व राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे. पण ज्यांच्यापासून संरक्षण हवे तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचे काय होईल? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
OBC Federation prepares to respond to Jarange’s protest
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा