Sanjay Shirsat : अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….”पार्थ पवार प्रकरणावरून संजय शिरसाट यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

Sanjay Shirsat : अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….”पार्थ पवार प्रकरणावरून संजय शिरसाट यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

Sanjay Shirsat

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे चुलत भाऊ असल्याने त्यांच्या जमीन घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. महायुतीतील इतर मंत्र्यांवर तुटून पडणारे रोहित पवार यांच्यावर यावरुन समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे. “अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….” असे ट्विट शिरसाट यांनी केले आहे.Sanjay Shirsat

पुण्यातील मुंढवा येथील कोरेगाव पार्क या भागातील महार वतनाची तब्बल 40 एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ यांनी खरेदी केल्याच्या प्रकरणावर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र विरोधी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर त्यांची भूमिका व्यक्त केलेली नाही. यावरुन सत्ताधारी शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षातील आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची (रोहित पवार) वाचा गेली….” असे ट्विट सामाजिक न्याय मंत्र्यांनी केले आहे.Sanjay Shirsat



संजय शिरसाट यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीवर समाज माध्यमातून व्यक्त होणारे आणि माध्यमांसमोर येऊन बोलणारे रोहित पवार हे गेल्या दोन दिवसांमध्ये कुठेही दिसलेले नाहीत. राज्यामध्ये सध्या ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यावर रोहित पवारांनी बोलले पाहिजे.

मंत्री शिरसाट म्हणाले की, काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो. नसलेल्या विषयांवर विद्वानासारखे बोलतात आणि तेच जणूकाही मुख्य न्यायमूर्ती आहेत असा न्याय निवाडा करतात. मात्र आता महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्यावर ते काही बोलताना दिसले नाही. म्हणून मला असं वाटायला लागलं की, यांची वाचा गेली की काय, म्हणून ते ट्विट केलं असल्याचा खुलासा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

ते म्हणाले की नितीमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या, स्वतःला विद्वान समजणाऱ्या या लोकांनी आता बोललं पाहिजे. तुम्ही निगेटीव्ह किंवा पॉझिटिव्ह कोणत्याही बाजूने बोलण्याची ताकद ठेवा. मात्र ते काही बोलले नाहीत, म्हणून मी म्हटलं आहे की, माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली.. असा टोला संजय शिरसाट यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

पुण्यातील उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये तब्बल 1804 कोटी रुपये बाजारमुल्य असलेली 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. या खरेदीवर साधारण 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाणार असल्यामुळे पार्थ पवार यांच्या कंपनीने राज्याच्या आयटी धोरणाचा लाभ घेतला. आयटी पार्कसाठी या जमीनीची खरेदी असल्याचा ठराव करुन मुद्रांक शुल्कामध्ये सूट मिळवली आणि फक्त 500 रुपयांची स्टँप ड्यूटी भरुन हा व्यवहार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी समिती गठित केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आला असल्याचे शक्रवारी सांगितले.

“Oh… my dear parrot has lost his voice!” — Sanjay Shirsat attacks Rohit Pawar over Parth Pawar issue

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023