विशेष प्रतिनिधी
नागपूर: कालपासून राहुल गांधी जे बोलायला लागलेत त्यावरून सेनेच्या प्रति अविश्वास दिसतो. आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. एकीकडे जयहिंद यात्रा काढायची आणि दुसरीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा, हे चालणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसला सुनावले.
नागपूरच्या खापरखेडा गावात रविवारी (भाजपने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान’ अशा शब्दांत इशारा दिला. या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः सहभागी झाले होते आणि त्यांनी एक किलोमीटर अंतर चालत यात्रा पूर्ण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली असली तरी भारतीय सैन्याविषयीचा विश्वास दाखवला पाहिजे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे सैन्यावरील विश्वास कमी होतो. भारतीय सेनेवर अविश्वास दाखवणाऱ्यांना ‘जय हिंद’ म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने ‘जय हिंद यात्रा’ काढली, ही स्वागतार्ह बाब असली तरी ती केवळ राजकीय यात्रा होऊ नये, ही आमची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलत आहेत, ते पाहता त्यांच्या वक्तव्यात भारतीय सेनेबद्दलचा अविश्वास दिसतो. जय हिंद’ तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने सेनेच्या पाठीशी उभे राहाल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम जाहीर केला. आज भारताची संरक्षणक्षमता पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पटीने अधिक आहे. भारत जगातील पहिल्या पाच सामरिक शक्तींपैकी एक आहे. आज ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश हे आपल्या सैन्यबळाचे आणि ‘मेक इन इंडिया’ शस्त्रसज्जतेचे जिवंत उदाहरण आहे.
तुर्कीसारखा देश दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देतो, हे मानवतेविरोधातील अपराध असल्याची टीका करत, भारतीयांनी अशा देशांशी व्यवहार न करण्याचा घेतलेला निर्णय हा देशभक्तीचाच एक भाग आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी भारतीय जनतेचे यासाठी अभिनंदनही केले.
On one hand, they wanted to hold Jai Hind Yatra and on the other hand, they had no faith in the army, Devendra Fadnavis told the Congress
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर