विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर टीका केली आहे. कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. Aditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत काही प्रश्न एमएमआरडीएला तसेच सरकारला उद्देशून केले आहेत. रहिवाशांना का माहिती देण्यात आली नाही? एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख करत आहे का? एमएमआरडीएने जमिनीवर उतरून त्यांच्या कामाच्या बनावटीवर लक्ष केंद्रित करावे, जसे की एमटीएचएल (अटल सेतू) जे त्यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. तसेच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का माहिती देण्यात आली नाही? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मातोश्रीवर पाळत ठेवण्याचा हा प्रकार आहे का? जर तो असेल तर तो कोण करत आहे. यामुळे मातोश्रीचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या छोट्या छोट्या नेत्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. अनेक गुन्हेगारांना सुरक्षा देण्यात आली आहे. पण मुद्दाम मातोश्रीच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. जी यापूर्वी कधीही करण्यात आली नव्हती. जर काही झाले तर ती जबाबदारी कुणाची आहे. हे सगळे वाईट संस्कार भाजपचे आहेत. यांना माहिती आहे की आपण चोरी करत सत्तेत आलो आहोत. आम्हाला असे काही करण्याची गरज नाही. सरकार काय करत आहेत. जर देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नसेल तर कुणाचा संबंध आहे.
Our house is being monitored in the name of BKC survey, alleges Aditya Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















