विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर केवळ तीन तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत केंद्र सरकारला इंदिरा गांधींसारखी कणखर भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.Rohit Pawar
“पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. जर त्याला अद्दल घडवायची असेल, तर बलुचिस्तानला स्वतंत्र करून पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे करण्याची आज गरज आहे,” असे रोहित पवार हणाले. त्यांनी 1971 मध्ये इंदिरा गांधींनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेची आठवण करून देत, आजच्या परिस्थितीतही सरकारने तितकीच ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.
भारतीय सेना सज्ज आहे. देशाला आपल्या सेनेवर पूर्ण विश्वास आहे. सरकारने आता निर्णय घ्यावा. संपूर्ण देश आणि राजकीय पक्षही सरकारसोबत उभे आहेत, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
शनिवारी युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानने जम्मू-कश्मीर, राजस्थानमधील जैसलमेर, बाडमेरसह कच्छच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला. काही ठिकाणी ड्रोन हल्ल्याचाही प्रयत्न झाला. बारमेरमध्ये सलग ड्रोन दिसल्याची नोंद आहे. श्रीनगरमध्येही स्फोट झाले. परिणामी, अनेक सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं. आतापर्यंत पाकिस्तानने ११ ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून ९ शहरांमध्ये ड्रोन हालचाली दिसून आल्या आहेत.
Pakistan will not improve; Take a firm stand like Indira Gandhi, Rohit Pawar advises the government
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित