विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोमांस तस्करी रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार आहोत, अशी घोषणा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात केली. गोमांस तस्करी करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मोक्का कायदाही लावण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. Pankaj Bhoyar
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गोमांस तस्करीप्रकरणी 25 मार्च रोजी दोन कंटेनर आणि त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले होते. पुण्यातील एका गोरक्षकाने याबाबत माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर, त्यांनी ही कारवाई केली होती. तसेच तपासणी अहवालात सदर कंटेनरमध्ये असलेले मांस गोवंशीय असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, गोमांस तस्करीचा मुद्दा उपस्थित करत भाजपा आमदार श्रीकांत भारतीय ) विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
लक्षवेधीच्या अनुषंगाने गोमांस तस्करीचा मुद्दा उपस्थित करताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी 57 हजार किलो गोमांस लोणावळा येथे पकडण्यात आले होते. हे गोमांस दुबईला पाठवण्यात येणार होते. आपल्या राज्यात अशाप्रकारे बेकायदेशीर गोमांस विक्री करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात एसआयटी स्थापन करून चौकशी करणार आहात का? तसेच असे तस्करी करणाऱ्या लोकांवर मोक्काअंतर्गत कारवाई करणार आहात का? असे प्रश्न उपस्थित केले.
गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, 57 हजार किलो गोमांस सिंहगड महाविद्यालयासमोर पकडण्यात आले होते. ही गंभीर बाब आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अटकेत आहेत. आपण या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन करणार असून मुळापर्यंत जाणार आहोत.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले की, आपल्या राज्यात 57 हजार किलो गोमांस पकडले गेले आहे. याचा अर्थ तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मला वाटतं की, आपल्या पोलीस खात्याचे हे पूर्णपणे अपयश आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला.
Pankaj Bhoyar announces that a law will be brought soon to prevent beef smuggling.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला