विशेष प्रतिनिधी
भंडारा : Parinay Fuke मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचाही बाप मीच वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.Parinay Fuke
भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच असे वक्तव्य केले होते. दरम्यान फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. फुके यांनी माफी मागावी अन्यथा, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेने दिला होता.Parinay Fuke
फुके म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. परंतु, माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
फुके म्हणाले होते की, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे.
Parinay Fuke Expresses Regret Over Misinterpreted ‘I Am Even Shiv Sena’s Father’ Remark
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!