विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prasad Lad हिंदी भाषेचा जीआर उद्धव ठाकरेंनी काढला होता. माशेलकर समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंच्या हातात दिला होता. ते किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते, हे लोकांच्या समोर येईल, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली.Prasad Lad
पत्रकारांशी बोलताना लाड म्हणाले, दोन ठाकरे बंधूंची युती झाली तर अभिनंदन आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊदे.. जोपर्यंत हे एक होणार नाहीत, तोपर्यंत त्यांची ताकद कळणार नाही. पण, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा अपमान उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून करण्यात आला. ते मनसेचे नेते विरसले का?
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
उद्धव ठाकरे हे आज सन्माननीय राज ठाकरे म्हणत आहेत. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना गरज लागते तेव्हा ते हात पकडतात. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा हात तर राहूल गांधी यांचे पाय पकडले. आज ते राज ठाकरे यांचा हात पकडू इच्छितात. राज ठाकरेंचा हात पकडताना काँग्रेस कुठे आहे, याचा विचार करत नाही. काँग्रेसने मुस्लीम मते ठाकरेंकडे दिली. आज तीच काँग्रेसची मते पळवून उद्धव ठाकरे राजकारण करीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकारण हीन दर्जाचं आहे, हे आपल्या लक्षात येईल,” अशी टीका लाड यांनी केली.
“निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा बाऊ केला जातोय. ‘म’ मराठीचा नाहीतर महानगरपालिकेचा आहे. हा प्रकार कुठेतरी उद्धव ठाकरेंनी थांबवला पाहिजे. राज ठाकरेंबद्दल त्यांची भूमिका जनतेत सांगितली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या अख्ख्या भाषणात एकतरी भूमिका मराठीबद्दल बोलून दाखवली का? हे सांगा. गद्दार, खंजिरच्या पलीकडे ते बोलले. यामुळे राज ठाकरे सुद्धा अचंबित झाले होते,” असा दावाही लाड यांनी केला.
People will see how bad Uddhav Thackeray was as a Chief Minister, says Prasad Lad
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी