विशेष प्रतिनिधी
नागपूर : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यूप्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. Police inspector in Parbhani suspended, Chief Minister’s announcement
परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर परभणीमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (३५ वर्षे) या तरुणाचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यंवंशी यांच्या मृत्यूबाबत निवेदन दिले. सोमनाथ सूर्यवंशीसोबत कोठडीमध्ये नेमकं काय घडलं होतं. याचा संपूर्ण घटनाक्रम देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी सांगितले की, ‘सोमनाथ सूर्यवंशी हे एक आंदोलक होते. ते वकिलीचे शिक्षण घेत होते. ज्यावेळी परभणीमध्ये जाळपोळ सुरु होती त्या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला होता. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील समावेश होता.’
सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा आजार होता. त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या. पोलिस कोठडीतून एमसीआरमध्ये गेले तेव्हा जेलमध्ये असताना सकाळच्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकैद्याने तक्रार केली होती की सोमनाथ यांना त्रास होत आहे. त्यांना लगेच रुग्णालयात नेलं तिथे त्यांना मृत घोषित केले गेले. याप्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी हे आरोपी असले तरी ते गरीब कुटुंबातील होते. ते वडार समाजाचे होते. पैशाने कोणाचा जीव परत येत नाही. पण त्यांच्या कुटुंबीयांना सरकार १० लाखांची मदत देईल. याप्रकरणी पोलिस निरीक्षक यांना निलंबित केले असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल.’
Police inspector in Parbhani suspended, Chief Minister’s announcement
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिलेल्या धक्क्यामुळे खाली पडून भाजप खासदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत
- Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला
- salman khan खो-खो विश्वचषकाचा पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगणार
- JPC formed वन नेशन-वन इलेक्शन विधेयकासाठी जेपीसी स्थापन