विशेष प्रतिनिधी
पुणे : सोशल मीडियावर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणाव निर्माण झाला आहे जमावातील काही लोकांकडून घरांची, दुकानांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कुणीही बेकायदेशीर कृत्ये करत असतील तर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यवतमध्ये गुरुवारी आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि सभा झाली होती. शुक्रवारी व्हॉट्सअपवरील एका ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली. पोस्टच्या काही तासांनंतरच यवतमध्ये दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्याकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. परंतु, काही कळण्याच्या आतच हा तणाव वाढत गेला आणि दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीनंतर जमावाने घरांना आणि दुकानांना लक्ष्य करत त्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी दिले, त्यामुळे या ठिकाणावरील तणाव आणखी वाढत गेला. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घरांना आगी लावण्याचा प्रयत्न झाला .
काही दुचाकी पेटवून देण्यात आल्या. दोन गटांमध्ये सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे. पोलिसांनी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून तणाव नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या घटनेची सगळी माहिती घेतली आहे . बाहेरच्या व्यक्तीने चुकीच स्टेटस ठेवल्याने आणि पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. काही ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला
आता परिस्थिती नियत्रणात आहे .दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसली आहेत तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे .काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल
मुख्यमंत्री म्हणाले, सभेचं आणि याचे कारण जोडण्याचं कारण नाही. सभा झाली म्हणून आम्ही असे केले अस कुणी म्हणत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आता ते व्हिडिओ तिथले आहे की बाहेरचे हे बघावे लागेल ,अशावेळी अनेकवेळा बाहेरचे व्हिडिओ टाकले जातात . या सगळ्या घटनेची चौकशी केली जाणार आहे. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. कुणीही कायदा हातात घेतला, बेकायदेशीर कृत्ये करत असतील तर कडक कारवाई केली जाणार आहे.
police lathicharge in Yavat, CM says situation under control
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान