विशेष प्रतिनिधि
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी घेऊन, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघणाऱ्या मराठा मोर्चाची सुरुवात झाली आहे. मात्र, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंत कोणतेही आंदोलन पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नसल्याचा आदेश दिल्यामुळे आता परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. दरम्यान, जालना पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या या आंदोलनाला परवानगी दिली आहे, मात्र त्यासाठी तब्बल ४० अटी घातल्या आहेत. Manoj Jarange
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून हा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. मनोज जरांगेंनी दहा वाजता आपल्या समर्थकांसह मार्गक्रमणास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी या मोर्चाचा मुक्काम जुन्नर येथे होणार असून त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर मार्गे हा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचणार होता. मात्र मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंत कोणतेही आंदोलन पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नसल्याचा आदेश दिल्यामुळे आता मोर्चा मुंबईला पोहोचणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. Manoj Jarange
या पार्श्वभूमीवर वकील विनोद पोखरकर यांच्याकडून न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आझाद मैदानात आंदोलन करण्यास कोर्ट परवानगी देईल असा विश्वास व्यक्त करून कोर्टात जाण्याची गरज नाही, असे पोखरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही तासात काय घटना घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जरांगे गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होतील, मात्र त्याआधी उच्च न्यायालयाकडून आणखी काही निर्देश दिले जातात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे महायुती सरकारकडूनही जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. Manoj Jarange
एकीकडे, राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग चालू असताना. दुसरीकडे, जालन्यात मात्र मराठा आरक्षणाची लढाई रंगत आहे. मोर्चासाठी अंतरवाली सराटी मध्ये मराठा समाजाचे मोठ्या संख्येने आगमन झाले आहे. मसाजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही आपल्या गावकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी निघाल्याचे सांगितले आहे. त्यांनी एकूण नऊ पिकअप आणि सहा चार चाकी गाड्यांसह मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला जालना पोलिसांनी परवानगी दिली असली तरी त्यासाठी तब्बल 40 अटी घातल्या आहेत.
काय आहेत प्रमुख अटी?
प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह किंवा जातीय तणाव निर्माण करणारी विधाने केली जाऊ नयेत. तसेच, प्रवासाचा मार्ग हा जाहीर केल्याप्रमाणेच राहील व त्यात कोणतेही बदल केले जाणार नाहीत अशी अट देखील पोलिसांनी घातली आहे. आंदोलनादरम्यान ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड सारख्या अत्यावश्यक सेवांना अडथळा येणार नाही याची खबरदारी देखील आंदोलकांनी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. प्रवासादरम्यान सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे आयोजक व आंदोलनकर्त्यांची राहील. तसेच, आंदोलनात सहभागी कोणतीही व्यक्ती शस्त्र, लाठी, तलवारी, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणार नाही याची खबरदारी घेण्यास देखील पोलिसांनी सांगितले आहेत. Manoj Jarange
Police set ’40’ conditions for Manoj Jarange’s protest
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा