Shrikant Shinde सीएमपदी एकनाथ शिंदेचं!, पण श्रीकांत शिंदे यांनी डिलीट केली पोस्ट

Shrikant Shinde सीएमपदी एकनाथ शिंदेचं!, पण श्रीकांत शिंदे यांनी डिलीट केली पोस्ट

Shrikant Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shrikant Shinde विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीतील नेत्यांमध्येच चुरस निर्माण झाली. श्रीकांत शिंदेंनी सीएमपदी एकनाथ शिंदेचं असावे, असं म्हटले होते. पण काही वेळातच ही पोस्ट डिलीट केली. Post deleted by Srikant Shinde

NewsSpectrumAnalyzer ने श्रीकांत शिंदे यांच्या ट्वीटचा फोटो शेअर केला. श्रीकांत शिंदेंच्या पोस्टमध्ये लिहिलं की, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्रीपदी पुन्हा. मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब विराजमान व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची ही भावना आहे. दरम्यान, काहीच वेळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, ही सर्वसामान्यांची भावना असल्याचं म्हटलं होते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 288 पैकी 237 जागा जिंकल्या आहेत. एकट्या भाजपला 136 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. भाजपच्या सर्वाधिक जागा असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून त्यांचे आमदारही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा सातत्याने करत आहेत. अशातच राजधानी दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंना हा संदेश दिल्लीतून कळवण्यात आला.

Post deleted by Shrikant Shinde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023