विशेष प्रतिनिधी
बंगळुरु : शेकडो महिलांवर बलात्काराचा आरोप झालेला माजी पंतप्रधानांचा नातू तथा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. घरातील सहाय्यक महिलेवर बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. कोर्टाने दिलेला निर्णय ऐकल्यानंतर माजी खासदार प्रज्वल रेवन्नाला रडू कोसळले. Prajwal Revanna
बंगळुरु येथील लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात पीडितेने कोर्टात सादर केलेली साडी महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. विशेष तपास पथकाने या गुन्ह्यात 123 पुरावे कोर्टात सादर केले होते.
प्रज्वल रेवन्नाच्या विरोधातील बलात्काराच्या खटल्यात पीडितेने एक महत्त्वपूर्ण पुरावा सादर केला. पीडितेने कोर्टात एक पुरावा म्हणून एक साडी सादर केली. प्रज्वल रेवन्ना याच्यावर घरातील सहाय्यक महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तिच्याजवळ घटनेच्या दिवशीची साडी देखील होती. तिच साडी पीडितेने पुरावा म्हणून कोर्टात सादर केली. तपासात त्या साडीवर स्पर्मचे अवशेष सापडले. यामुळे बलात्काराच्या आरोपांना अधिक बळकटी मिळाली. कोर्टात सादर करण्यात आलेली ही साडीच निर्णायक पुरावा ठरली आहे.
प्रज्वल रेवन्ना विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपात प्रज्वल रेवन्ना दोषी ठरला असून त्याला उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
प्रज्वल रेवन्ना विरोधात म्हैसूर येथील केआर नगर येथली त्यांच्या घरातील सहायक महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीवरुन म्हैसूर येथील सीआयडी सायबर क्राइम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेवर दोन वेळा बलात्कार आणि या दुष्कृत्याचा व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. सीआयडीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) प्रज्वल रेवन्ना बलात्कार खटल्यात 2000 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यांनी केलेल्या तपासातील 123 पुरावे सादर केले.
सीआयडीच्या तपास अधिकारी शोभा आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. 31 डिसेंबर 2024 रोजी या खटल्याची सुनावणी सुरु झाली. कोर्टामध्ये 23 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याशिवाय कोर्टात व्हिडिओ क्लिप आणि फॉरेन्सिक रिपोर्ट, घटनास्थळाचा पंचनामा कोर्टात सादर करण्यात आला. सात महिन्यामध्ये खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला, त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवन्नाला दोषी ठरवले.
रेवण्णा याचे आजोबा एच.डी.देवेगौडा हे भारताचे माजी पंतप्रधान असून वडील एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. या दोघांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश करणाऱ्या रेवण्णा हे हासन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रेवण्णा गेल्या 14 महिन्यांपासून तुरुंगात असून त्यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आणि बलात्काराचे आरोप केले होते. सोशल मीडियावर रेवण्णा यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली होती. यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि त्यांना अटक करण्यात आली.
Prajwal Revanna guilt was filled, he cried profusely after being found guilty in the maid rape case
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान