विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणीतरी म्हणते गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही आणि त्यांच्या स्टेजवर सुळे जातात. याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेणार आणि त्यांना प्रश्न विचारणार, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. Prakash Shendge
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मराठा आंदोलन म्हणजे जरांगे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले असा आरोप करत संतप्त मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या भेटल्या. Prakash Shendge
याबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे ते जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशाला? त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिले आणि त्याच आज जरांगेना पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात? याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?
प्रकाश शेंडगे म्हणाले, सुप्रिया सुळे यांना कोणी दगड मारले हा आमचा प्रश्न नाही, ते सरकार आणि पोलिसांनी पहावे. जरांगे यांची कायद्याला धरून मागणी नाही, घटनेला धरून मागणी नाही. कोणीतरी म्हणते गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही आणि त्यांच्या स्टेजवर सुळे जातात. याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेणार आणि याबाबत त्यांना प्रश्न विचारणार, असे शेंडगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांची मागणी कायद्याला धरुन नाही. याबाबतीत कागदपत्रे माझ्याकडे आहेत. अॅड जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे. कुणबी वेगळे आहेत, मराठा वेगळे आहेत. त्यामुळे जी मागणी केली जात आहे ती घटनेला धरुन नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेली शिंदे समिती आणि त्यांनी दिलेला अहवाल हा बोगस असल्याची टीका करत प्रकाश शेंडगे म्हणाले, आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. 58 लाख देण्यात आलेले दाखले बोगस आहेत. मराठा समाजाची फसवणूक सुरु आहे. सर्व दाखले बाद होणार आहेत. इतिहासातील गॅझेटमध्ये नाव आहे म्हणून तो मागास आहे असे होत नाही. त्यामुळे देण्यात आलेले दाखले बोगस आणि खोटे आहेत. जर असे दाखले देणे शक्य असते तर पूर्ण देश ओबीसी झाला असता. उद्या दुपारी ३ वाजता मिटिंग आहे. आम्ही सर्व ओबीसी एकत्र येत आहोत आणि या सगळा गोष्टींच्या विरोध करणार आहोत.
Prakash Shendge Warns of Questioning Sharad Pawar Over Supriya Sule’s Presence on Jarange’s Stage
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल