विशेष प्रतिनिधी
पुणे : फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून प्रशांत बनकर या अटक केली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तळहातावरील सुसाइड नोटमध्ये लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. Prashant Bankar
या महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहेत. मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. Prashant Bankar
या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले. प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली. पोलिसांनी फार्महाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलिस ठाण्यात आणण्यात येणार असून, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, दुसरा आरोपी जो पोलिस असल्याचे सांगितले जाते, तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही अविवाहित महिला डॉक्टर दोन वर्षांपासून फलटण येथे कार्यरत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वादात भरडली जात होती. कारण वैद्यकीय तपासणी अहवालाविषयीच्या वादातून तिची चौकशी सुरु होती. त्यामुळे ती खूप मानसिक तणावात होती. तिने वारंवार वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली होती. माझ्यावर अन्याय होत आहे. मी आयुष्याची अखेर करेन, असे ती वारंवार म्हणत होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने नामांकित हॉटेलात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अखेर केला. त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या.
या प्रकरणात निलंबित पोलिस उपनिरीक्षक बदने बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. परळीतच त्याचे शिक्षण झालेले आहे. फलटणमध्ये त्याची या महिला डॉक्टरशी ओळख झाली. त्याने आपण म्हणू तसाच अहवाल देण्यासाठी तिच्यावर दबाव आणल्याचे निदर्शनास आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलिसांवर तसेच इतर सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले. दोशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आले आहे. प्रशांत बनकर पोलिस नसून सामान्य नागरिक आहे.
Prashant Bankar arrested in Phaltan female doctor suicide case
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















