विशेष प्रतिनिधी
गोंदिया: राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. आमची भाजपसोबत जाण्याची इच्छा खूप आधीपासून होती आणि मोठे साहेब शरद पवार यांचीही तीच भूमिका होती, असे त्यांनी स्पष्ट केले. Praful Patel
गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना पटेल म्हणाले, “2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचे ठरवले होते. त्याचवेळी भाजपने शिवसेनेपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गाडी मध्येच घसरली आणि तो प्रयत्न अपुरा राहिला.”
ते पुढे म्हणाले, “निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. आमच्या सहकार्यामुळे हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष झाले. मात्र नंतर पुन्हा गोंधळ झाला आणि आम्ही मागे पडलो, तुम्ही (भाजप) पुढे निघून गेला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संबंधांवर भाष्य करताना पटेल म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना दोघेही शिवसेनेत एकत्र होते. नंतर वेगळे झाले. आता पुन्हा एकत्र आले तरी त्यात काही वेगळं नाही, त्यामुळे त्याचा राजकारणावर मोठा परिणाम होणार नाही.”
Preparations for BJP-NCP alliance were in full swing in 2014, reveals Praful Patel
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला