विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “आभारी आहे, असे पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरून परत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मोदींनी त्यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काल पार पडलेल्या वर्धापन दिन मेळाव्यानंतर शरद पवार आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पत्रकार परिषदेदरम्यान या विषयावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता, त्यांनी आभारी आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
गेल्या काही आठवड्यांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा होत आहे. महायुतीमध्ये शरद पवार सहभागी होणार का? यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी केलेली विचारपूस आणि शरद पवार यांचे सकारात्मक उत्तर हे सौहार्दपूर्ण राजकीय संकेत मानले जात आहेत.
जिल्हा दौऱ्यावर असताना शरद पवारांनी हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “हवामान खात्याकडून आलेली माहिती चांगली आहे. पावसाचा उशीर झाला असला, तरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. अलीकडे हवामान विभाग जे सांगतो, तेच प्रत्यक्षात घडते.
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा. देण्याची तयारी दाखविली आहे. यावर शरद पवार म्हणाले, “जयंत पाटील यांनी स्वतः नवीन पिढीला संधी द्यावी, असे सुचवले आहे. ते गेल्या आठ वर्षांपासून हे पद सांभाळत आहेत. अजून याबाबत निर्णय झालेला नाही, पण पुढील काळात पाहूया.
Prime Minister Narendra Modi inquired about Sharad Pawar’s health; Pawar said, I am grateful
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला
- Sanjay Raut : आंदोलने केली नाहीत तर सत्ताधारी माजतील, संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा
- Ajit Pawar : जाणीवपूर्वक बदनामी, माझ्या खिशातले पैसे देताे का? अजित पवारांच समाजकल्याण मंत्री संजय शिरसा
- Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, नारायण राणे यांची चिरंजीव नितेश राणे यांना समज