विशेष प्रतिनिधी
मुबई : काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपद शर्यतीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माघार घेतली आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि सतेज पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.
“प्रदेशाध्यक्ष पदासाठी मी इच्छुक नाही. जी चर्चा सुरू आहे, ती मला माहित नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिल्ली येथे बोलतानाआज नव्या काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन होत आहे त्याचा आनंद आहे. अकबर रोडवरील कार्यालयाला मोठा इतिहास आहे” असं ते म्हणाले.
माजी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. “महिलांना संधी मिळाली तर चांगलंच आहे. पक्ष कोणाला संधी देतो बघू” असं त्या म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राज्य स्तरावर संघटनात्मक फेरबदल होतील अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार असल्याची चर्चा आहे.अजून काँग्रेस हायकमांडने तशी पावलं उचलेली नाहीत. पण नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद दिसून येतेय. काही नेते अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांना जबाबदार ठरवत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतरची काँग्रेस पक्षाची ही सुमार कामगिरी आहे. काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आलेत.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला सत्तेचे डोहाळे लागले होते. राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार यावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यावेळी दिल्लीतील नेत्यांकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याला संधी देण्याचा विचार सुरू होता. यात माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचे नाव अग्रक्रमावर होते. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. स्वतः यशोमती ठाकूर या देखील पराभूत झाल्या. त्यामुळे आता काँग्रेस हायकंमांड त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार करेल का असा प्रश्न आहे.
Prithviraj Chavan’s withdrawal from the race for Congress state president
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती