विशेष प्रतिनिधी
पाटणा : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणूक आयाेगावर आराेप करत असताना त्यांच्या भगिनी व काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी थेट निवडणूक आयुक्तांना धमकी दिली आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने जगता येणार नाही असा इशारा प्रियंका गांधी यांनी दिला. Priyanka Gandhi
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काल पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. रीगा येथे झालेल्या सभेत भाषण करताना त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे. Priyanka Gandhi
निवृत्ती सुखाची होईल असे समजू नका..
प्रियंका गांधी म्हणाल्या, “ज्ञानेश कुमार, जर तुम्हाला वाटतं असेल की, निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येईल, तर तसे होणार नाही. मी जनतेला सांगते, या नावाला कधीही विसरू नका. Priyanka Gandhi
हरियाणामध्ये मतांची चोरी कशी झाली, ते तुम्ही पाहिले. मी तुम्हाला सांगते, ही तीन नावे लक्षात ठेवा- ज्ञानेश कुमार, एस. एस. संधू आणि विवेक जोशी. या लोकांनी लोकशाहीशी विश्वासघात केला आहे. जनता आमची आई आहे. आई उदार असते, पण जर तिच्याशी फसवणूक झाली, तर ती माफ करत नाही. हे लोक निवृत्ती घेऊन शांततेत राहतील असे वाटत असेल, तर त्यांनी तो विचार आता सोडून द्यावा.
यापूर्वी राहुल गांधींनीही अनेकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला की, हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सुमारे 25 लाख बनावट मतांच्या माध्यमातून ‘चोरी’ झाली आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस समर्थक मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, निवडणूक आयोगाने राहुल यांचा आरोप फेटाळून लावला आहे.
You won’t be able to live happily, Priyanka Gandhi threatens Election Commissioner
http://youtube.com/post/UgkxhhoCbBPb55rX5mlGwYQ4QV5wjTe8nBH8?si=ptKZdLAsZvBfnqCU
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले


















