विशेष प्रतिनिधी
पुणे : Sharad Pawar महापालिका निवडणुकांची मुदत जरी आणखी वाढली असली तरी नेते मंडळी मात्र निवडणुकीसाठी चनगलीच कामाला लागलेली दिसत आहेत. विविध शहरात, गांवात जाऊन तेथिल नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न ही नेते मंडळी करतांना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील वानौरी येथे त्यांच्या पक्षाची बैठक घेतली.
वानौरी येथील शहरातील पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितले आणि तरुण उमेदवारांना संधी देण्यावर भर दिला. पवार म्हणाले की, पक्ष लवकरच स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची की मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवायची याचा निर्णय घेईल. “युती, जागा आणि रणनीतीचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिल आहे. Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बैठकी दरम्यान सांगितले की, त्यांचा पक्ष पुण्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल. पुण्यातील जलद शहरी वाढीकडे लक्ष वेधत पवार यांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्यसेवा तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांवर प्रकाश टाकला. ३०-४० मजली इमारतींमध्ये आता शेकडो रहिवासी राहतात असे नमूद केले. “पुण्याच्या समस्या सोडवणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही जे काही करावे लागेल ते करू,” असेही ते म्हणाले. Sharad Pawar
या बैठकीदरम्यान शहर युनिट प्रमुख प्रशांत जगताप यांनी युतींबाबत लवकर निर्णय घेण्याचे आवाहन केले. पुण्याच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज देखील त्यांनी अधोरेखित केली. शहरी समस्यांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकतांना जगताप यांनी पुणे शहर वाहतूक कोंडीत जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले.
एकीकडे शरद पवार यांनी या बैठकीमध्ये स्वतंत्रपणे निवडूक लवढवण्याचा इशारा दिला. तर दुसरीकडे मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांची एका खाजगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला. Sharad Pawar
Promise to solve civic problems in Pune; Sharad Pawar ready for municipal elections
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!