विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणीत झालेल्या आंदोलनात अनेक अनुयायांना अटक करण्यात आली. त्यातील एकाचा आज पोलीस कस्टडीत मृत्यू झाला आहे, त्यात जेवढ्या जणांना पोलिसांनी पकडलं आहे त्यांना सोडून द्यावे तसेच भीमसैनिकांना मारहाण केली त्या पोलिसांची चौकशा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, आंबेडकरी समाज, संविधान प्रेमींना आवाहन आहे की उद्या संविधान वाचवण्यासाठी अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत.
परभणीत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान शिल्पाची एका माथेफिरूने विटंबना केली होती. संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर परभणीत बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले. दुपारपर्यंत हा बंद शांततेत सुरू होता. मात्र दुपारनंतर एका टोळक्याने शहरात अक्षरशः धुडगूस घातला. ज्यात शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच सामान्य परभणीकरांच्या गाड्या आणि इतर साहित्याची ही मोठी हानी झाली. परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी (३५) असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली. या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या ५० लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आयजी शहाजी उमाप यांनी दिली. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही, असेही उमाप यांनी स्पष्ट केले.
Protester dies in custody in Parbhani Anandraj Ambedkar’s call for Maharashtra bandh tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Raju Shetty साखरेचे दर कोसळल्याचा शेतकरी व ग्राहकांनाही फटका, राजू शेट्टी यांची चौकशीची मागणी
- Sanjay Raut’ : संजय राऊतांचा ‘नैराश्येतून एकला चलोचा नारा , विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- Vijaya Rahatkar : काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, पण त्यामुळे महिला संरक्षण कायद्यांवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्य!!
- D Gukesh : बुद्धिबळाचा नवा राजा…ठरला भारताचा डी गुकेश! विजयानंतर अश्रू अनावर झाले