Pune Crime News : नगरसेविका पदासाठी इच्छुक चैताली भोईरकडून पतीचा खून; चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री घडला प्रकार

Pune Crime News : नगरसेविका पदासाठी इच्छुक चैताली भोईरकडून पतीचा खून; चारित्र्याच्या संशयातून मध्यरात्री घडला प्रकार

Pune Crime News

विशेष प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड: Pune Crime News पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांच्या पत्नीनेच गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चैताली भोईर हिने चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादातून ओढणीने नकुलचा गळा आवळून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. Pune Crime News



चैताली भोईर या आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेविका पदासाठी इच्छुक होत्या. नकुल आणि चैताली हे दोघेही चिंचवड परिसरात राहत होते. रात्री उशिरा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या चैतालीने घरातील ओढणीने पतीचा गळा आवळला. काही वेळातच नकुल बेशुद्ध पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या वेळी त्यांची दोन आणि पाच वर्षांची लहान मुले शेजारच्या खोलीत झोपलेली होती. Pune Crime News

नकुल भोईर हे पिंपरी चिंचवडमधील ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते. ते स्थानिक समस्यांवर काम करीत असत आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय होते. त्यांच्या पत्नी चैताली हिनेही महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. पर्यावरण चळवळीतही ते काम करत. ढाण्या वाघ म्हणून त्यांची ओळख होती.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की नकुल भोईर हे त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा वाद सुरू झाला आणि त्याच वादातून चैतालीने ओढणीने पतीचा गळा दाबला.

या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चैताली भोईरला अटक करून कसून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की, वादाचे नेमके कारण आणि घटनेमागील इतर शक्यता तपासल्या जात आहेत.

http://youtube.com/post/Ugkx3DZ1NNiw5y6nenhl-moJoUOPM4ekxW09?si=dLenMnr3MrAwZcB4

तसेच नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय असल्याने आर्थिक कारणावरूनही वाद झाल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. सध्या पोलिसांनी शेजाऱ्यांची आणि नातेवाईकांची चौकशी सुरू केली असून, फॉरेन्सिक तपासणी आणि पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

Pune Crime News : Aspiring Corporator Chaitali Bhoir Strangles Husband to Death Over Suspected Infidelity in Midnight Incident

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023