विशेष प्रतिनिधी
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक पार पडली. पुण्यातील संकल्प हॉल मध्ये ही बैठक पार पडली. Raj Thackeray
राज ठाकरे यांच्याकडून आज पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक पार पडली. पुण्यातील संकल्प हॉल मध्ये ही बैठक पार पडली यावेळी मनसे चे वरिष्ट नेते उपस्थितीत होते. यासोबतच शहरातील सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे स्वतः शाखा अध्यक्ष यांना मार्गदर्शन करणार होते.
मतदार याद्या तसेच पक्ष संघटनेच्या बाबत राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांना प्रश्न विचारले असता अपेक्षित उत्तरं ही समाधानकारक आणि सकारात्मक न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय काम केले हे दाखवा. मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत?” असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. “जे पदाधिकारी काम करणार नाहीत किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत त्यांना काढून टाका,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
बैठकीत सुरवातीलाच राज ठाकरे यांनी एका प्रमुख पदाधिकाऱ्याला त्याच्या सोशल मिडिया पोस्ट वरून फटकारले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा अनेक प्रश्न विचारले. मतदार याद्या तसेच पक्ष संघटनेच्या बाबत राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांना प्रश्न विचारले असता अपेक्षित उत्तरं ही समाधानकारक आणि सकारात्मक न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
शाखाध्यक्षांची बैठक ही किमान एक ते दोन तास चालणं अपेक्षित होतं. यावेळी पुणे शहरातील विविध प्रश्न त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबत असलेली रणनीती तसेच मतदार यादी यांच्यातील गोंधळ याबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हे या बैठकीचा मूळ उद्देश होता. मात्र शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून निराशा जनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणं पसंत केलं.
Raj Thackeray loses his cool in Pune; slams party officials saying, ‘If you don’t want to work, give up your posts’
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी


















