विशेष प्रतिनिधी
Raj Thackeray राज्य सरकारने अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं”, असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे.Raj Thackeray
लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील तब्बल 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे. या बोर्डाने याबद्दल 103 शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक विनंती करत केंद्र सरकारने संसदेच्या या अधिवेशनातच वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक मंजूर करून घ्यावं. तसेच राज्य सरकारने पण, अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं.., असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात राज ठाकरेंनी वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकात नक्की काय होतं याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच राज ठाकरेंनी राज्य सरकारने अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे पहावं, असाही सल्ला दिला आहे.
राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे… यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही.
दरम्यान, वक्फ बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस पाठवलेल्या नाहीत असेमंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवल्याची चर्चा सुरु होती. परंतु अशा पद्धतीच्या कुठलीही नोटीस वक्फ बोर्डाने पाठवले नसल्याचे वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. एका शेतकऱ्याने जमिनी संदर्भातचा दावा न्यायालयात दाखल केला आहे त्यानुसार न्यायालयाने शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्या असून त्याचा वक्फ बोर्डाशी कुठलाही संबंध नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केले आहे.
Raj Thackeray’s advice to the state government should see that farmers’ lands do not go into the Waqf’s throat
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची होणार कठोर पडताळणी
- Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज
- Markadwadi मारकडवाडीत EVMs विरोधात केला मोठा आरडाओरडा; पण जयंत पाटलांनी घेतला आमदाराच्या राजीनाम्याचा धसका!!
- CM Fadnavis : शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर, लोकसभेत मिळालेली मते दाखवली