विशेष प्रतिनिधी
मुंबई : अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत. तू राजीनाम मागणारा कोण? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे अनिल परब यांना केला आहे. Ramdas Kadam
रामदास कदम यांच्या पत्नी आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईमध्ये सावली बार आहे. या बारवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावरून रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत रामदास कदम दस्तऐवज दाखवले. ते म्हणाले, योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असलेले हॉटेल हे शरद शेट्टींना चालवायला दिले होते. त्यावेळी करारनाम्यात कॉलम 6 मध्ये असे म्हटले आहे की, कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही.
तसेच काही चुकीचे कृत्य घडल्यास जबाबदारी केवळ धंदा चालवणाऱ्यांची राहील, मालकाची नाही. करारनाम्यातील नियमांचा भंग झाल्याने तसेच अन्य गोष्टी आढळल्याने आम्ही तात्काळ त्याला बाहेर काढले, दोन्ही लायसन्स तेव्हाच जमा केले आहेत. लायसन्स 13 तारखेला जमा केले आहेत. मात्र, अनिल परबने 18 जुलै रोजी विधिमंडळात विषय काढला.
या हॉटेलचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. तू राजीनामा मागणारा कोण?” असं म्हणत रामदास कदम यांनी परब यांच्यावर टीका केली. सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत. हे महाशय दिशाभूल करताहेत, आम्ही लायसन्स पहिलेच जमा केलेले आहेत. डान्सबार सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत. नियमबाह्य हे विधानमंडळात हे विषय काढले आहेत. हे आरोप तात्काळ काढून टाकावेत. आम्ही सभापतींना अर्ज दिलेला आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.
“कावळा कितीही काव काव करतो, त्याची आम्ही दखल घेत नाही,” असे म्हणत उद्धव ठाकरे आणि अनिल परब हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. मी सर्वच पत्ते उघड करणार नाही. पण आमच्या अंगावर जे चालून आले त्यांच्यावर नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे, कोणालाही सोडलेले नाही. जे आमच्या मुळावर येण्याचा प्रयत्न करताहेत भविष्यात त्यांना उत्तर मिळेल, असा इशारा रामदास कदम यांनी अनिल परब यांना दिला.
Ramdas Kadam attacks Anil Parab
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान