विशेष प्रतिनिधी
पुणे : निलंबित आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी पुण्यात दाखल होताच राजकीय आणि निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. कासले लवकरच पोलिसांसमोर शरण जाणार असल्याचे त्यांनी व्हिडीओद्वारे जाहीर केलं असून, दाखल होताच त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
कासले यांनी दावा केला की, निवडणुकीच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात तब्बल 10 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे परळी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी देण्यात आले होते, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत,” असा स्पष्ट दावा त्यांनी केला.
रणजित कासले यांनी सांगितले की, हे पैसे “संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन” नावाच्या एका कंपनीकडून आले होते. ही कंपनी परळीच्या आंबाजोगाईतील असून त्यात महादेव कराड आणि काळे हे भागीदार आहेत. याच कंपनीकडून 10 लाख रुपये त्यांच्या खात्यावर आले. त्यापैकी साडे सात लाख रुपये त्यांनी परत केले असून उर्वरित अडीच लाखांमधून त्यांनी वैयक्तिक खर्च चालवला, असे त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी यावेळी आपल्या बँक खात्याचे तपशील देखील उघड केले. “माझ्या खात्यात त्या दिवशी फक्त 416 रुपये होते. त्यानंतर 10 लाख जमा झाले. हे सर्व पैसे निवडणुकीसंदर्भातील दबावासाठी होते. माझ्यावर तोंड बंद ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता,” असा गंभीर आरोप त्यांनी केला
कासले यांच्या म्हणण्यानुसार, मतदानाच्या दिवशी त्यांची ड्युटी ईव्हीएम मशीनजवळ लावण्यात आली होती. परंतु अचानक त्यांना त्या ड्युटीवरून हटवण्यात आलं. “परळीमध्ये अपुरं मनुष्यबळ असतानाही मला हटवण्यात आलं, हे संशयास्पद आहे. मला दिलेल्या ऑर्डरची प्रत माझ्याकडे आहे,” असा दावा त्यांनी केला.
कासले यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या निवडणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, “सरकार फ्रॉड आहे. एकनाथ शिंदेंचं सरकार सोडून अजित पवार यांची एवढी मते कशी मिळाली, यावर संशय आहे.” त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर छेडछाड झाल्याचा आरोप केला
याआधी देखील कासले यांनी दावा केला होता की, त्यांना वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५ कोटी, १० कोटी आणि ५० कोटी रुपये देण्याची ऑफर मिळाली होती. हे आरोप त्यांनी यापूर्वी केलेल्या व्हिडीओमधून केल्याने त्यावर आधीच वाद निर्माण झाला होता
सध्याच्या घडामोडींवर मत व्यक्त करताना कासले म्हणाले, “पळून काही उपयोग नाही. मी संकटांचा सामना केला आहे. पण संपूर्ण यंत्रणेविरोधात लढणे अशक्य आहे. त्यामुळे मी लवकरच पोलिसांना शरण जाणार आहे.”
Ranjit Kasle’s explosive allegation, “10 lakhs came into my account, Dhananjay Munde was elected through fraud”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : खुर्ची बदलली असली तरी विकासाचे विमान आणि इंजिनही तेच , एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
- Mahagyandeep : देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल ‘महाज्ञानदीप’ महाराष्ट्रात सुरू
- Kalakendra Artists : तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती, आशिष शेलार यांची माहिती
- NCW अध्यक्षा विजयाताई रहाटकर उद्यापासून हिंसाचारग्रस्त बंगाल दौऱ्यावर; मुर्शिदाबाद, मालद्यात जाऊन देणार पीडित कुटुंबीयांना आधार!!