Ranjitsinh Nimbalkar : फलटण डॉक्टर आत्महत्येचे गलिच्छ राजकारण, रणजितसिंह निंबाळकर यांचा आरोप

Ranjitsinh Nimbalkar : फलटण डॉक्टर आत्महत्येचे गलिच्छ राजकारण, रणजितसिंह निंबाळकर यांचा आरोप

Ranjitsinh Nimbalkar

विशेष प्रतिनिधी

सातारा : Ranjitsinh Nimbalkar फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्येचे गलिच्छ राजकारण केले जात आहे. या प्रकरणात महिला डॉक्टरचा जीव गेला. त्या महिलेने जीव का दिला? त्याचे कारण शोधण्याची गरज आईहे. पण महाराष्ट्रात काही झाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जातात, तसे इथे काही झाले की आमच्या नावाची बदनामी केली जाते. ही परंपराच निर्माण झाली आहे. पण फलटणकर याला भीक घालणार नाहीत. जे विरोधात असतात ते नेहमीच कोणत्याही प्रकरणात दबाव असल्याचा आरोप करतात. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येत एका माजी खासदाराचा कथित हात असल्याचाही आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar)  यांनी स्वतः समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे.



फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी गुरूवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर खासदाराच्या दोन पीएंवर तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे हा खासदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या भावावर आरोप केले.

http://youtube.com/post/UgkxftgFyX-npxXbDs97l7lun4hCcL9id1F8?si=AsSxL_B2fCd4cxvR

यावर निंबाळकर म्हणाले, या प्रकरणात आम्हीच समोर येऊन या घटनेची विस्तृत चौकशी व तपास करण्याची मागणी करत आहोत. सीडीआर खोटे बोलत नाही. त्यामुळे सीडीआर असेल, व्हॉट्सएप मेसेज, चॅट असेल तर त्यातून सत्य वस्तुस्थिती समोर येईल पण त्या भगिनीचा जीव गेला. त्यात कुणाला राजकारण करायचे आहे हे संपूर्ण तालुक्याला कळले आहे. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार काहीजण करत आहेत.

Ranjitsinh Nimbalkar Accuses Opposition of Playing Dirty Politics Over Phaltan Doctor’s Suicide

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023