विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या काेरेगाव पार्क जमीन प्रकरणात खालच्या अधिकाऱ्यांनी खरी बदमाशी केली. एक तहसीलदार, मुद्रांक अधिकारी व देणारे – घेणारे दोन लोक, या लोकांनी केलेली ही चूक आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. Chandrashekhar Bawankule
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांचा घोटाळा भाजपनेच बाहेर काढल्याचाही आरोप केला आहे. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ना अंबादास दानवे यांना, ना चंद्रशेखर बावनकुळे यांना किंवा किंवा मुख्यमंत्र्यांना हे माहिती होते. खालचे अधिकारी काय करतात हे सरकारला थोडेच माहिती असते. जेव्हा बातमी येते तेव्हा सरकार त्याची दखल घेते. त्यामुळे रोजच्या व्यवहारात खालचा एखादा तलाठी, एखादा तहसीलदार किंवा एखादा मुद्रांक अधिकारी काय करेल हे सांगता येत नाही. त्यांना आदेश देण्याचा अधिकार आहेत. ते त्यांच्या अधिकारांचा कसा गैरवापर करतात हे सरकारला थोडेच माहिती असते. सरकारला जेव्हा माहिती होते तेव्हा कारवाई होते. Chandrashekhar Bawankule
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा दिल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले, हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मी स्वतः त्यावेळी वर्षा बंगल्यावर होतो. अजित पवार व त्यांचे सहकारी एका वेगळ्याच कामासाठी तिथे आले होते. त्यावेळी त्यांच्यात दानवे म्हणतात तशी कोणतीही चर्चा झाली नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वेगळाच विषय घेऊन आले होते. त्यात पुरवणी मागण्या व महायुतीचे काही विषय होते. त्यामुळे मला असे वाटते की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात मी नोटीस दिली नाही. आमच्या खालच्या अधिकाऱ्याने दिली. मी आज नियमांची पाहणी केली. केंद्र व राज्याच्या नियमांसह मुद्रांक नियम तपासले. त्यानुसार व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते. व्यवहार 300 कोटींचा आहे. त्यानुसार आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी बजावलेली 42 कोटींची नोटीस योग्य आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी माझी भेट घेतली. आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला. मी प्रतिक्रिया दिली.
सरकारने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत कारवाई केली आहे. कुठेही कुणालाही पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात नाही. आम्हाला पार्थ पवार किंवा इतर कुणाला अडकवण्याचा आम्हाला धंदा नाही. आमचा अजेंडा हा महाराष्ट्राचा विकास व विकसित महाराष्ट्राचा आहे. भ्रष्टाचाराच्या अशा प्रकरणांत सोलून काढले जाईल. सरकार महाराष्ट्रात कुठेही भ्रष्टाचार सहन करणार नाही. किमान महसूल खाते. माझ्या खात्यात तरी मी असे काही सहन करणार नाही. ज्यांनी त्या ठिकाणी लुटण्याचे काम केले, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले जाईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
महाविकास आघाडीत फार धुसफूस सुरू आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यात प्रचंड धुसफूस सुरू आहे. जाहिरनाम्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे. मुंबईचा जाहीरनामा कसा जाहीर करणारे हे ही त्यांना ठावूक नाही. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर कसे करणार हे ही त्यांना माहिती नाही. मुंबई महापालिका तब्बल 40 वर्षे त्यांच्या ताब्यात होती. त्यांनी मुंबईला खऱ्या अर्थाने मागे ठेवण्याचे काम केले असा आराेप करून बावनकुळे म्हणाले, पुढे काय करायचे हे ही त्यांना ठावूक नाही. पण एक गोष्ट मला नक्की माहिती आहे. मुंबई व महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या मागे आहे. मोदी व फडणवीसांचे डबल इंजिन सरकारच मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करू शकते हे जनतेला ठावूक आहे. जनता ही विकासाच्या बाजूने आहे, असे ते म्हणाले.
Real mischief by lower officials in Koregaon Park land case, claims Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















