विशेष प्रतिनिधी
पुणे : Jitendra Awhad फर्ग्युसन कॉलेज परिसरात २०१६ मध्ये झालेल्या वाद प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना सर्व आरोपांतून मुक्तता देण्यात आली आहे. पुण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी हा आदेश दिला. या निर्णयामुळे आव्हाड यांच्यावर असलेली आठ वर्षांपूर्वीची कायदेशीर कारवाई संपुष्टात आली आहे.
२२ मार्च २०१६ रोजी फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित “ट्रुथ ऑफ जेएनयू” हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काही आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाला. दुसऱ्या दिवशी, आमदार आव्हाड (Jitendra Awhad) हे राष्ट्रवादी समर्थकांसह कॉलेज परिसरात आंबेडकरी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या आगमनानंतर भाजप युवा मोर्चा (BJYM) कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. काही वेळातच वातावरण ताणले आणि दोन्ही गटांमध्ये दगडफेक व ढकलाढकली सुरू झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या गोंधळात आव्हाड यांच्या गाडीवर दगड, बाटल्या आणि पादत्राणे फेकण्यात आल्याचा आरोप होता.
http://youtube.com/post/UgkxItF8zzW5vogrVZ4wYpEr3Uzqoip4xV8S?si=Sfu7mfEGv270ObN7
या घटनेनंतर आव्हाड आणि काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने आता या प्रकरणात आव्हाड यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने नमूद केले की, “आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या प्रकरणात आरोपीविरुद्ध खटला चालविण्याचे कारण नाही.”
या निकालानंतर आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “ही माझ्या सत्य आणि न्यायावरील श्रद्धेची विजय आहे. माझ्यावर राजकीय हेतूने कारवाई करण्यात आली होती, जी न्यायालयाने फेटाळली आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यांनी हा निकाल राजकीय सूडबुद्धीविरुद्धचा विजय असल्याचे म्हटले आहे.
Relief for MLA Jitendra Awhad in Ferguson College controversy case; Pune court acquits him of all charges
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा