विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आले की स्थानिक पदाधिकारी पक्ष बदलतात. एखादा व्यक्ती जर पक्षात येण्यासाठी तयार असेल तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा लागतो. यामुळे काही पक्ष प्रवेश होत राहतात. पण त्यातून एकनाथ शिंदे नाराज होतील आणि अमित शहा यांची भेट घेतली यामध्ये काही तथ्य नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी भाजपकडून पदाधिकाऱ्यांना फाेडले जात असल्याची तक्रार त्यांनी केली असे म्हटले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे नाराज नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, नगरविकास खाते आणि केंद्र सरकारच्या समन्वयाच्या काही विषयावर एनडीएचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना एनडीएचे नेते काही काळानंतर भेटत राहतात ही आमची परंपरा आहे. एकनाथ शिंदे भाजपवर नाराज आहे या बातम्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. शिंदेंनी भेट घेतली ती स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीला बहुमत मिळावे यासाठी होती, ते भाजपवर नाराज नाहीत.
बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, यांच्यासह मी सुद्धा आहे. त्या समितीमध्ये हे ठरले आहे की मित्रपक्षामधील कोणाचाही पक्ष प्रवेश करायचा नाही. पण जेव्हा स्थानिक पातळीवर तिकीट मिळत नाही तेव्हा पदाधिकाऱ्यांना मित्रपक्षांत जात तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पक्षात असे झाले आहे. तिन्ही पक्षांचे लोक इकडे तिकडे गेले आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी नाही.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपल्याला पक्षाकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आले की स्थानिक पदाधिकारी पक्ष बदलतात. एखादा व्यक्ती जर पक्षात येण्यासाठी तयार असेल तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवावा लागतो. यामुळे काही पक्ष प्रवेश होत राहतात, त्यातून एकनाथ शिंदे नाराज होतील आणि अमित शहा यांची भेट घेतली यामध्ये काही तथ्य नाही.पक्षप्रवेशामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माझ्यासोबत ते समन्वय साधतात. एवढ्या कारणासाठी ते अमित शहा यांच्याकडे गेले नाही.एकनाथ शिंदे यांनी एनडीएचे नेते म्हणून राज्याच्या विकासासाठी अमित शहा यांची भेट घेतली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्यायचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. निवडणूक आयोगाने 27 टक्के ओबीसी आणि सर्व मिळून आरक्षण दिले आहे. ओबीसींचे 27 टक्के आरक्षण कायम राहिले पाहिजे ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एनडीएची भूमिका आहे.
Reports of Eknath Shinde Meeting Amit Shah Out of Displeasure Are Baseless, Says Chandrashekhar Bawankule
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















