विशेष प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याबरोबरील वाद विकोपाला गेल्याने मोहोळचे अजित पवारांचे निष्ठावंत त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटाला रामराम करून राजन पाटील भाजपमध्ये जाणार आहेत. Rajan Patil
उमेश पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना राजन पाटील म्हणाले, मी छोट्या माणसाबद्दल बोलत नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे, त्यामुळे आम्ही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे, माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत आहेत, त्यामुळे ते देखील आमच्या निर्णयाशी सहमत आहेत. ते देखील आमच्यासोबत येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे संकते दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटलांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
राजन पाटील हे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बडे नेते मानले जातात. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. मात्र आता त्यांनी अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते असलेले उमेश पाटील यांच्याबाबत जिल्ह्यात प्रचंड नाराजी आहे. राजन पाटील यांचा पक्ष त्याच दृष्टीने बघितला जात आहे.
Rift with Umesh Patil Escalates, Rajan Patil Likely to Quit Ajit Pawar’s Camp
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा