विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: Kolhapur साऊंड सिस्टीमवरून झालेल्या किरकोळ वादातून कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. दोन गटांमध्ये झालेल्या तणावातून दंगल उसळल्याने सिद्धार्थनगर परिसरातील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी 100 ते 150 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.Kolhapur
कोल्हापुरातील भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा वर्धापनदिन शुक्रवारी साजरा करण्यात येत होता. या वर्धापन सोहळ्यासाठी दुपारी सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ साऊंड सिस्टीम लावण्यात आली. परंतु, या साऊंड सिस्टीममुळे परिसरातील मुख्य रस्ता अडवला गेला. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली, त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी येऊन ती सिस्टीम बंद केली. मात्र रात्री 9.30 वाजताच्या सुमारास मोठा जमाव सिद्धार्थनगर परिसरात आला. यावेळी त्यांनी ढोल ताशे आणून पुन्हा वर्धापन दिन साजरा करण्यास सुरुवात केला. मात्र, यावेळी अचानकपणे या जमावातील काही तरुणांनी वाहनांची तोडफोड केली, काही वाहने उलटवून त्यांना पेटवण्यातही आले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सिद्धार्थनगरात एकच गोंधळ उडाला.Kolhapur
एका गटाने परिसरात घातलेल्या गोंधळानंतर यावेळी या परिसरात असलेला निळा ध्वज सुद्धा फाडण्यात आला. ज्यामुळे या परिसरातील दुसरा गट आक्रमक झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंचा जमाव आमनेसामने आला आणि दगडफेक सुरू झाली. काही काळासाठी या परिसरात धुमश्चक्री झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पेट्रोलने भरलेल्या बाटल्याही फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमध्ये काही लोक जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे काही तासांनंतर या ठिकाणावरील परिस्थिती नियंत्रणात आली.
दोन्ही बाजूकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. 10 पेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकींचे या घटनेत नुकसान झाले. तर काही वाहने पेटवण्यात सुद्धा आली. या दंगलीत महिलांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडे महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना मोठी कसरत करावी लागली.
जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी शांततेचे आवाहन केले आहे. गैरसमजातून झालेला वाद असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे दगडफेक करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली.
Riots break out in Kolhapur over minor dispute, vehicles set on fire
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार