अमरावती विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत रस्सीखेच; राणा विरुद्ध पोटे संघर्ष तीव्र

विशेष प्रतिनिधी

अमरावती: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.मात्र अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महायुतीसाठी मोठे राजकीय पेच निर्माण झाले आहेत. भाजपाकडून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर आहे.मात्र, रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पोटेंच्या नावाला विरोध केला आहे.महत्वाचे म्हणजे अमरावती स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या जागेवर राणा दाम्पत्याने दावा केला आहे, त्यामुळे भाजपा नेतृत्वासमोर तिढा निर्माण झाला आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून,१८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

प्रवीण पोटेंच्या उमेदवारीला राणा दाम्पत्याने विरोध दर्शवला आहे. नवनीत राणा यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर प्रवीण पोटे यांनी भाजपा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत जबाबदार स्वीकारली होती.राणा समर्थकांकडून पोटेंच्या उमेदवारी विरोधात पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू असल्याचे बोलले जात आहे.



दरम्यान, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने देखील अमरावतीच्या जागेवर आपला दावा ठोकला आहे.शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.त्यामुळे, अमरावतीच्या जागेचा तिढा अधिकच वाढला आहे.भाजपा, शिवसेना आणि राणा गट या तिन्ही बाजूंनी दबाव वाढत असल्याने महायुतीसमोर उमेदवार निवडीचे आव्हान आता उभे राहिले आहे.

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारसंख्या आणि राजकीय पेच पाहता ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मदतारसंघात एकूण ४५३ मतदार आहेत.विजयासाठी आवश्यक मतांचे गणित जुळवताना महायुतीला अंतर्गत नाराजी नियंत्रणात ठेवणे महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

Rivalry in the Mahayuti in the Amravati Legislative Council elections; Rana vs. Pote clash intensifies

महत्वाच्या बातम्या