विशेष प्रतिनिधी
तासगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लाडक्या बहिणींनी जोरदार झटका दिला. अनेक दीक्षित यांना पराभूत केले. मात्र तासगाव- कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना मात्र लाडक्या बहिणीने तारले. लाडक्या बहिणीमुळे त्यांचा विजय साकार झाला.
रोहित पाटील यांना माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आव्हान दिले होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी सभा घेतली होती
मात्र रोहित पाटील यांच्यासाठी निवडणूक मैदानात उत्तरलेल्या स्मिता पाटील यांनी आपल्या लाडक्या मायासाठी तब्बल १८ दिवस रोज १३ तास वेळ देऊन यशस्वीपणे प्रचाराची पुरा सांभाळली. त्यांनी प्रसंगी आक्रमक पवित्रा घेत टाकलेली पावले व केलेले योग्य नियोजन यामुळे रोहित पाटील यांचा विजय सुकर झाला.
रोहित पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून प्रारंभापासूनच आपला प्रचार सुरू केला होता. मतदारापर्यंत स्वतंत्रपणे पोहोचून त्यांच्यानी आपलेपणाने संवाद साधत आपला मतदानरुपी आशीर्वाद मिळावा अशी भावनिक हाक त्यांनी दिली होती त्यांचा हा प्रचार लक्षवेधी ठरला होता.
स्मिता पाटील यांनी आपले बंधू रोहित पाटील हे निवडणूक रिंगणात असल्याने त्यांच्या प्रचारासाठी दिनांक १ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर असे तब्बल १८ दिवस दिले. सकाळी नऊ ते रात्री १० पर्यंत रोजचे १३ तास रोहित पाटील यांचा प्रचार करीत होत्या तासगाव शहरासह परिसरात स्मिता पाटील यानी सुमारे २० बैठका घेऊन थेट संवाद साधला. या बैठकीत त्यांनी आबा कुटुंचियांनी केलेली कामे सांगून रोहितही असंच काम करेल, अशी माही देऊन आपणा सर्वांचा मतदान रुपी आशीर्वाद त्याला मिळावी, अशी भावनिक हाक दिली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ठिकाणी आपण चिंता करू नका आम्ही रोहित दादा पांनाच मतदान करणार आहोत असा विश्वास मतदारराजांनी दिला. काही समाज बांधवांच्या पार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी उपस्थित राहून स्मिता पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला
स्मिता पाटील यांनी रोहित पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असतानाच प्रचारासाठी असणारी वाहने यावरती मोबाईलवरून त्या नियंत्रण ठेवत होत्या. तसेच मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी त्यांनी बूथ मीटिंग घेऊन आवश्यकता सूचना कार्यकत्यांना केल्या होत्या. एवढेब नव्हे तर मतदार यादीत लावण्यात आलेली बोगस नावे डोळ्यासमोर ठेवून मतदान केंद्रावर त्यांचा हेतू साध्य होणार नाही, असे नेटके नियोजन आक्रमक पवित्र घेत त्यांनी केले होते. मतदाना दिवशी त्यांनी रस्त्यावर उतरून घेतलेला आक्रमक पवित्रा घेऊन्, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष याच घेऊन रोखलेली बोगस मतदान प्रक्रिया यामुळे बुधवर असलेल्या कार्यकत्यांचे मनोपैर्य वाढले होते. हे सर्व त्यांचे पाऊल सर्वांनाच थक्क करणारे असेच होते. त्यामुळे रोहित पाटील यांच्या विजयाच्या शिल्पकार स्मिता पाटील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.