विशेष प्रतिनिधी
पुणे : चुलतभाऊ असलेल्या पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या चार दिवसांपासून अवाक्षर काढले नव्हते. वाचा गेली का अशी टीका त्यांच्यावर होत होती. अखेर त्यांनी मौन सोडले आहे पण पार्थ पवारांच्या बचावासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. Rohit Pawar
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्याच्यावर मात्र कारवाई होते. सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको घोटाळ्याप्रकरणी कारवाई झाली नाही, पण पार्थ पवार यांच्या प्रकरणी सुपरफास्ट कारवाई केली जात आहे, असा भेदभाव न करता कारवाई करण्यात यावी असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची गरज भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या निवडणुकीसाठी आहे. मुंबईची निवडणूक संपली की एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले जाईल. त्यांना पूर्णपणे राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करू दिले जाणार नाही. जो व्यक्ती चुकीचा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
सिडकोचे प्रकरण असो की नवी मुंबईमधील खडीचे प्रकरण असो की नाशिकमधील जमिनीचे प्रकरण, शिरसाट यांच्या एमआयडीसीचा मुद्दा असे अनेक मुद्दे आहेत. ज्या काही सरकारी जमिनी आहेत किंवा कुळाच्या जमिनी आहेत कुणाच्याच नावाने होत नाही त्यावर ज्यांनी ज्यांनी ताबा घेतला आहे किंवा त्यावर घातले आहे अशा सर्वांवर कारवाई करण्यात यावी.
रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री तुम्ही लोकांवर लक्ष ठेवून आहात पण मुंबईमध्ये जिथे भाजपचे कार्यालयाबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. सरकारी कुठलीही जमीन कोणत्याही पक्षाला देता येत नाही ते देऊ नये अशी आमची भूमिका आहे. भाजपला आता कुबड्यांची गरज संपलेली आहे. अमित शहा यांनी इथे येत सांगितले आहे की कुबड्यांची गरज नाही म्हणून त्या तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळे झाले आहेत.
Rohit Pawar targets the Chief Minister to defend Parth Pawar
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















