Rohini Khadse : रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, खडसेंसा एकनाथ शिंदेंना टोला

Rohini Khadse : रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, खडसेंसा एकनाथ शिंदेंना टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohini Khadse काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे विरोधकांचे महायुतीवर हल्ले वाढले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू म्हणत शिंदे यांना टोला लगावला आहे. Rohini Khadse



खडसे यांनी कवितेतून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि महायुतीला चांगेलच चिमटे काढले आहेत. दिल्ली दरबारी जाऊन आल्यापासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. त्यांनी मोदी आणि शाह ठरवतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले असले तरी त्यांचे अचानक मुळ गावी दरे येथे जाणे, आजारी पडणे यामुळे नाराजी स्पष्ट दिसत आहे.यावरूनच खडसे यांनी कवितेतून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. खडसे यांनी एक्सवर याविषयीची एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी रुसू बाई रुसू या मथळ्याखाली शिंदे आणि महायुतीला चिमटे काढले आहेत.

रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्यू, ढिश्यू। आहा… ही ही… हो हो, आता तुमची गट्टी फू!

लालबाल, बारा वर्षं, बोलू नका कोणी, चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी। महाराष्ट्राचा लाडका भाऊ का रुसला? सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला?

अशी जोरदार फटकेबाजी खडसे यांनी या कवितेतून केली आहे.

‘Rusu bai Rusu’ Rohini Khadse criticises Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023