विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून सत्ताधाऱ्यांना खडसावले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आपण कशासाठी कोणाचे उदाहरण देतो, भाषा काय वापरतो. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे ? छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांना मूर्ख म्हणतात, कशासाठी तर हिंदी भाषेच्या सक्तीसाठी. सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आपण कोणाचं उदाहरण देतो, भाषा काय वापरतो याची भान ठेवावी. महापुरुषांचा अवमान करणं ही सत्ताधाऱ्यांची अधिकृत संस्कृती झाली आहे का? या सत्ताधाऱ्यांना कसली मस्ती आली?
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या छत्रपती संभाजीराजेंबाबतच्या वक्तव्यावरही वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज व मराठीचा अपमान केला. शिंदेसेना व एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा संतापजनक सवाल संजय गायकवाड यांनी केला.
Sanjay Gaikwad’s statement sparks outrage
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी