विशेष प्रतिनिधि
मुंबई : मराठा आंदोलक गेल्या ५ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आता त्यांना आझाद मैदान सोडण्याचा आदेश दिला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, त्यांना मुंबई मधीलच एका स्टेडियमची जागा देऊन तिथे आंदोलन करू देण्याची मागणी केली आहे. Sanjay Raut
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य हजारो मराठा बांधव हे आझाद मैदानावर २९ ऑगस्ट पासून आंदोलन करत आहेत. मात्र उच्च न्यायालयाने आखेर त्यांना आझाद मैदान सोडण्याचा आदेश दिला आहे. यावरच संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, न्यायालयाचे म्हणणे योग्य आहे. परंतु हे सर्व मराठा बांधव आहेत, ते महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले आहेत. ते कोणी घुसखोर नाहीत. ते उपरे किंवा परप्रांतीय नाही. मात्र त्यांनी केवळ कायद्याच्या चौकटीतच आंदोलन करावे, असं आवाहन देखील राऊत यांनी आंदोलकांना केले आहे. Sanjay Raut
गौतम आदानींसारखे अनेक लोक मुंबईत राहतात, ज्यांनी मराठी माणसाची धारावीच गिळली. त्यांना मुंबई बाहेर काढा असे न्यायालय का म्हणत नाही? परंतु आमच्या मराठा बांधवांना बाहेर काढण्यासाठी मात्र तात्काळ निर्णय झाला, असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले की, सरकार या आंदोलनाबाबत गंभीर नाही. बाहेर लोकं उपाशी असतांना उपसमिती मधील लोकं मात्र काजू बदाम खात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य नाही. जाती-जातींना एकमेकांविरोधात उभे करण्याचे, माणसांना कोर्टात पाठवून अराजकता निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी सरकारवर लावला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केले होते तेव्हा त्या आंदोलनसमोर नरेंद्र मोदी सरकारला झुकावे लागले होते आणि तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले होते. हे आंदोलनही त्याच प्रकारचे आहे. सरकारला घटन दुरुस्ती करून मराठा, धनगर, ओबीसींना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे लागेल. परंतु सरकारने जर आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र विस्कळीत होईल.
‘या’ स्टेडियम वर करा आंदोलन – संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, मला वाटत आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडियम वर जागा द्या, अशी सूचना कोणाकडून तरी आली होती. मात्र वानखेडे स्टेडियमला क्रिकेटचे सामने होत असतात. तेथे म्युझियम उभारले आहेत, तसेच सचिन तेंडुलकर, शरद पवार, सुनील गावस्कर यांचे पुतळे उभारलेले आहेत. त्यापेक्षा, मुंबईत सध्या ज्या मैदानावर क्रिकेटचे सामने होत नाहीत आणि तो केवळ श्रीमंतांचा क्लब आहे. ते ब्रेबान स्टेडियम ज्याला आपण CCI क्लब म्हणतो, ते मराठा आंदोलनासाठी मराठा बांधवांना देण्यात यावे असे संजय राऊत यांनी सूचवले आहे. Sanjay Raut
ब्रेबान स्टेडियम आंदोलकांना देणे अधिक योग्य राहील, असं संजय राऊत यांनी म्हणलं आहे. आझाद मैदानावर पावसामुळे चिखल होतो, कार्यकर्त्यांना बसता येत नाही. त्यामुळे ते रस्त्यावर येतात. त्यापेक्षा त्यांना ब्रेबान स्टेडियमची जागा देऊ शकलो तर ते योग्य राहील, हे मी फार गांभीर्याने सांगतोय असं देखील संजय राऊत म्हटले.
Sanjay Raut advised to protest at ‘This’ stadium in Mumbai instead of Azad Maidan
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi मतचोरीच्या ‘अणुबॉम्ब ‘नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू , राहुल गांधी यांचा इशारा
- Chhagan Bhujbal जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसीतून मराठा आरक्षण विरोधासाठी मुंबईवर धडक
- ओबीसी कोट्यातून आरक्षणास ‘एसईबीसी’चा अडथळा, मराठा समाजाची दोन्ही आरक्षणे जाण्याची भीती
- Politicians during Ganesh Festival : गणपती बाप्पाच्या दर्शनात राजकारण्यांची मांदियाळी!