विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्राने पाकच्या कुरापतींविरोधात विविध देशांत सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. पण आता ठाकरे गटानेच या शिष्टमंडळाला पाठिंबा दर्शवत संजय राऊत यांना घरचा आहेर दिला आहे. प्रस्तुत शिष्टमंडळ राजकीय नसून, दहशतवादाविरोधातील आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाच्या माध्यमातून देशासाठी जे काही योग्य व आवश्यक आहे ते आम्ही करू, अशी ग्वाही ठाकरे गटाने या प्रकरणी केंद्राला दिली आहे. Sanjay Raut
ठाकरे गटाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काल विविध देशांना भेटी देण्यासंबंधीच्या शिष्टमंडळासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. हे शिष्टमंडळ राजकारणाशी नव्हे तर भारताच्या दहशतवादाच्या भूमिकेशी संबंधित असल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही सरकारला या शिष्टमंडळाच्या माध्यमातून देशासाठी जे काही योग्य व आवश्यक आहे ते करण्याची ग्वाही दिली. खासदार प्रियंका चतुर्वेदी देशातील इतर खासदारांसोबत या शिष्टमंडळाचा भाग असतील.
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी दहशतवादाविरोधात विशेषतः पाक स्थित दहशतवाद व तेथील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दर्शवला आहे. आम्हीही सर्वजण दहशतवादाविरोधात सशस्त्र दलांच्या पाठिशी आहोत. याप्रकरणी कोणतेही दुमत असता कामा नये.
तथापि, पहलगाम हल्ल्यासंबंधी राजनैतिक स्थिती व अपयशी गुप्तहेर व सुरक्षा यंत्रणांविषयी आमचे स्वतःचे मत आहे. याविषयी आम्ही देशहित लक्षात घेऊन सरकारला प्रश्न विचारत राहू. पण पाक पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करण्यासाठी व त्याला एकाकी पाडण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर एकजूट झाले पाहिजे यात दुमत नाही. या या प्रकरणी एकजूट असली तरी आम्ही केंद्र सरकारला गोंधळ व गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी या शिष्टमंडळाची राजकीय पक्षांना चांगल्या पद्धतीने माहिती देण्यासाठी प्रोटोकॉलचा वापर करण्याची सूचना केली आहे.
काल दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेचा हा तपशील असून, आम्ही देशहितासाठी करण्यात येणाऱ्या कोणत्याही कारवाईला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. विशेषतः पहलगाम हल्ला ते ऑपरेशन सिंदूरपर्यंतच्या सर्वच मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी केली आहे. दहशतवादाविरोधात आपण सर्वजण एकजूट आहोत. जयहिंद, असे ठाकरे गटाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Sanjay Raut exposed, Thackeray group supports all-party delegation
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर