विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. त्यामुळे त्यांनी 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत.
संजय राऊत (Sanjay Raut ) दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. यावरून सकाळचा भोंगा म्हणून विरोधकांकडून त्यांची हेटाळणीही केली जाते. पण आज त्यांची पत्रकार परिषद झाली नाही. 15 दिवसांपूर्वीच त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आज त्यांची पत्रकार परिषद झाली नसल्याचे पाहून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी शंका उपस्थित केली होती. झालेही तसेच. संजय राऊत यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्राद्वारे आपल्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे स्पष्ट केले. तसेच पुढील किमान 2 महिने आपण सार्वजनीक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
http://youtube.com/post/UgkxidjWqNG9vsFmRUsUMcrTKFQglZlDi5Cf?si=_ZJv4hNz10ZeUAUB
संजय राऊत (Sanjay Raut) आपल्या पत्रात म्हणाले की, सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.
2020 मध्ये संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 स्टेन टाकण्यात आले होते. तत्पूर्वी, त्यांच्या हृदयात 2 ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी अँजिओप्लास्टी केली होती. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या सल्लानुसार सातत्याने तपासणी करत आहेत. या स्थितीतही ते आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे जनतेपुढे मांडतात. या प्रकरणी मध्यंतरी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली. पण ते मागे हटले नाही. उलट त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामापासून मात्र संजय राऊतच यांना दूर ठेवले होते.
Sanjay Raut’s Health Deteriorates, to Stay Away from Public Life for Two Months
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी
 
				 
													



















