विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Shirsat काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच त्यांच्या दरे गावावरून परतले. आज त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र, त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिले. Sanjay Shirsat
आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी आलो आहोत. एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत विरोधकांनी लावलेले आरोप खोटे आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आराम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शिंदे साहेब सकाळपासून कुणाला भेटले नाहीत. ते आराम करत आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले.Sanjay Shirsat
श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात दखल देणार नाहीत
संजय शिरसाट यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरही भाष्य केले. श्रीकांत शिंदे यांनी कधीही मी महाराष्ट्राच्या राजकारणात येईल असे सूतोवाच केले नाही. ते उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीच. ते दिल्लीतील राजकारण पाहणार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात दखल देणार नाहीत, असे शिरसाट म्हणाले.
संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल
एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये खाते वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याचे पालन केले जाईल. आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फ्रेंसद्वारे देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत खाते वाटपावर तोडगा निघू शकेल. या सर्व गोष्टींचे मंगळवारी संध्याकाळापर्यंत चित्र स्पष्ट होईल, असेही शिरसाट यांनी सांगितले.
महायुतीत सर्वकाही आलबेल
या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनेला डावलले जात असल्याच्या चर्चा निराधार आहे. महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे. कुणीही कुणाला डावलण्याचा प्रयत्न करत नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले.
Sanjay Shirsat reveals meeting cancelled due to Eknath Shinde’s health
महत्वाच्या बातम्या
- Prithviraj Chavan पृथ्वीराज चव्हाण म्हणाले- फेरपडताळणीचा फायदा होणार नाही, EVM मशीनमध्ये प्रोगाम फीट आहे का हे तपासावे लागणार
- BJP : सावंत, राठोड, सत्तार आणि केसरकर यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरून महायुतीत खरखर
- Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले – माझ्या नेतृत्वात 82 जागा आल्या होत्या, बाबांनी 82 च्या 42, पटोलेंनी 42 च्या 16 केल्या
- Imtiaz Jalil : ईव्हीएमवर निवडणुका घेऊ नका, ताकद कळेल, इम्तियाज जलील यांचा सरकारला इशारा