विशेष प्रतिनिधी
फलटण : Satara Doctor Crime News सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून, तिच्या मृतदेहाच्या हातावरच सुसाईड नोट लिहिलेली आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. Satara Doctor Crime News
ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरच्या मृतदेहाच्या हातावर पेनाने लिहिलेली सुसाईड नोट आढळली असून, त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केला. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यांनीही मानसिक छळ केला असल्याचे त्यात म्हटले आहे.Satara Doctor Crime News
सदर महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी वाद झाल्यानंतर त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान, त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी फलटण पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमार्टमसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि न्याय्य चौकशीची मागणी केली आहे.
http://youtube.com/post/Ugkx3DZ1NNiw5y6nenhl-moJoUOPM4ekxW09?si=II7sVZT2qOyzF61K
दरम्यान, पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणातील प्रत्येक बाब फॉरेन्सिक पुरावे आणि सुसाईड नोटच्या तपशीलांच्या आधारे तपासली जात आहे.
याबाबत या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
Satara Doctor Crime News : Female doctor commits suicide in Phaltan; Police Inspector accused of rape in suicide note written on hand
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















