Sayaji Shinde : स्टार प्रचारक सयाजी शिंदेंची अजितदादांकडे एन्ट्री; राष्ट्रवादीतली थांबविणार का गळती??

Sayaji Shinde : स्टार प्रचारक सयाजी शिंदेंची अजितदादांकडे एन्ट्री; राष्ट्रवादीतली थांबविणार का गळती??

Sayaji Shinde

विशेष प्रतिनिधी 

नाशिक : गेला महिना – दीड महिना सातत्याने फक्त गळतीच्या बातम्यांचा अनुभव घेणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला आज एकदम सुखद राजकीय धक्का बसला. बॉलीवुड, टॉलीवुड, कॉलीवूड आणि मराठीतले सुपरस्टार सयाजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे छगन भुजबळांना अत्यानंद होऊन त्यांनी उद्याचा दसरा आजच साजरा केला. Sayaji Shinde star prachar Ajit pawar

सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच अजितदादांनी त्यांच्याकडे स्टार प्रचारक पदाची जबाबदारी सोपवली. पण आत्तापर्यंत सातत्याने गळतीचा अनुभव घेत असलेल्या अजितदादांची राष्ट्रवादी सयाजी शिंदे यांच्या एंट्रीनंतर आत्मविश्वास वाढवून पक्षातून होणारी गळती रोखू शकेल का??, हा सवाल तयार झाला आहे.

गेल्या दीड दोन महिन्यांत अजितदादांच्या राष्ट्रवादीतून सातत्याने फक्त गळतीच्याच बातम्या येत होत्या. लोकसभेत अजितदादांना बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणता आले नाही. त्यानंतर ते कुटुंबातच लढत लावल्याबद्दल आपली चूक कबूल करून बसले. लोकसभेत अजितदादांच्या राष्ट्रवादीची फारशी चमकदार कामगिरी झाली नाही, हे पाहून पक्षातल्या आमदारांमध्येच चलबिचल सुरू झाली आणि अनेक आमदार शरद पवारांच्या गळाला लागले. समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर, बबनदादा शिंदे, राजेंद्र शिंगणे हे नेते पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले. दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भरती वाढली. त्याचा मुख्य फटका अजितदादांना आणि भाजपला बसला. त्यामुळे अजितदादा महायुती सोडून पुन्हा काकांच्या वळचणीला जाऊन बसणार, अशा बातम्याही मराठी माध्यमांमधून डोकवायला लागल्या.

या पार्श्वभूमीवर अजितदारांच्या राष्ट्रवादीसाठी बऱ्याच दिवसांनी सकारात्मक बातमी समोर आली. सुपरस्टार सयाजी शिंदे यांच्या रूपाने प्रथमच अजितदादांच्या राष्ट्रवादीत एका बड्या व्यक्तीने एन्ट्री केली आहे. सयाजी शिंदे यांच्या एन्ट्रीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची गळती थांबणार का??, अजितदादांच्या राष्ट्रवादीला नेमका कोणता राजकीय बूस्टर डोस मिळणार??, असे सवाल तयार झाले आहेत.

सह्याद्री देवराईच्या रूपाने सयाजी शिंदे यांचे पर्यावरण आणि सामाजिक काम मोठे आहे. ते परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सगळ्या महाराष्ट्रात स्वतंत्र उमद्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा असणे ही सयाजी शिंदे यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. शिवाय कुठलीही वादग्रस्तता अजून त्यांना घेरू शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि पर्यावरणीय कामाचा तसेच उमद्या व्यक्तिमत्त्वाचा राजकीय लाभ करून घेण्याचा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा इरादा आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत लवकरच दिसणार आहे.

Sayaji Shinde star prachar Ajit pawar

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023