विशेष प्रतिनिधी
सातारा : Shambhuraje Desai पाटण विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे गटाचे आणि मंत्री शंभूराज देसाई यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. मी या पक्ष प्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.Shambhuraje Desai
भाजप मध्ये प्रवेश केलेले सत्यजितसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. शंभूराज देसाई पक्षाशी गद्दारी करून सुरत मार्गे गुवाहाटी पळून गेले असा टोला त्यांनी मारला होता. देसाई यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.मी या पक्ष प्रवेशा बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे.आम्ही कधीही गद्दारी केली नाही जो शिवधनुष्य बाण 1997 बाळासाहेब ठाकरे यांनी दिला तो आजही माझ्या हातात आहे, असेही देसाई म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप पक्ष प्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेल उत्तर दिले होते. आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याच काय कारण होतं असा सवाल त्यांनी केला.
यावर उत्तर देताना देसाई म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकर यांनीच आत्ता पर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत.त्यांनी काँग्रेस ,राष्ट्रवादी पुन्हा अपक्ष परत मशाल आणि आता कमळ हातात घेतले आहे.आम्ही गद्दारी केली असती तर विधानसभा निवडणुकीत अपक्ष सत्यजित पाटणकरांची रिक्षा आम्ही पलटी केली नसती.
Shambhuraje Desai’s Tilpapad will complain to the Chief Minister and Deputy Chief Minister due to Patankar’s entry into the BJP
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी