शनि मंदिराच्या विश्वस्थांचा देवाच्या नावाने भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

शनि मंदिराच्या विश्वस्थांचा देवाच्या नावाने भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शनि शिंगणापुर येथील शनि मंदिराच्या विश्वस्थांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणार्‍यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. Shani Shingnapur temple

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. पण इथे देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारझाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अहवालानुसार देवस्थानच्या कारभारात 2447 बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि बाहेरची टीम पाठवून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, यासंदर्भात विधी व न्याय मंत्री म्हणून मी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल पाहिल्यावर ईश्वराच्या ठिकाणी सुद्धा लोक किती भ्रष्टाचार करू शकतात याचा भयानक नमुना समोर आला आहे. दोनशे ते अडीचशे कर्मचाऱ्यांवर देवस्थान चालत होते. त्याच देवस्थानात २४४७ कर्मचारी नेमले. देवस्थानच्या रुग्णालयात ३४७ कर्मचारी कामावर असल्याचे दाखविले. तपासणी केली तेव्हा एकही रुग्ण रुग्णालयात नव्हता. १५ खाता ८० वैद्यकीय अधिकारी आणि २२७ अकुशल कर्मचारी दाखविले. रुग्णालय परिसरात कोणतीही बाग आढळून आली नाही. पान नसलेल्या बागेसाठी ८० कर्मचारी दाखविले. 109 खोल्या असलेल्या भक्तनिवासात 200 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले, प्रत्यक्षात 2 ते 10 कर्मचारी आढळले.देणगीसाठी 8 आणि तेल विक्रीसाठी 4 काउंटरवर केवळ 2 कर्मचारी काम करत असताना, तिथे 325 कर्मचारी दाखवण्यात आले. 13 गाड्यांच्या पार्किंगसाठी 163 कर्मचारी दाखवले, प्रत्यक्षात 13 कर्मचारी आढळले.

मुख्यमंत्री म्हणाले, शेती विभागात 65 कर्मचारी दाखवले तसेच पाणी पुरवठा विभागात 79 कर्मचारी दाखवले. गोशाळा विभागात ८२ कर्मचारी दाखवले गेले, त्यापैकी 26 कर्मचारी रात्री 1 वाजल्यानंतर काम करत होते. पार्किंग परिसर स्वच्छ करण्यासाठी 118 कर्मचारी दाखवले. सुरक्षा विभागात 315 तसेच प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवले, ते कुठेही दिसून आले नाहीत. एकूण 2, 474 कर्मचारी कागदोपत्री दाखवले होते, पण प्रत्यक्षात त्यांची नोंदच नव्हती.

आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत शनिशिंगणापूर प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला. शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये बनावट ऍप आणि पावत्या छापून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंदिर संस्थानातील इतर विभागांमध्येही प्रचंड अनियमितता आढळली असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, कार्यकर्त्यांना खाती उघडायला लावून मंदिरातील पैसे त्यांच्या खात्यात वळवले जात होते, असा अहवालात दावा आहे. पूजेच्या पैशासाठी नकली ऍप वापरले जात असल्याचेही समोर आले आहे. या सर्व गंभीर आरोपांची कसून चौकशी केली जाणार असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

Shani Shingnapur temple trustees commit corruption in the name of God, Chief Minister orders strict action

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023