विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi नाशिक येथील मेळाव्यात माेदी सरकारवर टीकेचे आसूड ओढणाऱ्या शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाचे काैतुक केले आहे. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची प्रगती हाेओ अशा शुभेच्छा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत. PM Modi
१७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तावा वाढदिवस आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील सातत्याने मोदींच्या काही योजनांवर टीका करताना दिसतात. पण आज पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी , तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची प्रगती सतत होत राहो आणि येणाऱ्या काळात देशाचे अधिकाधिक कल्याण आणि विकास होत राहो अशी मी आशा करतो,अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. PM Modi
काँग्रेसचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा.अमित शाह म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक आकांक्षांचे केंद्र बनले आहे. अंतराळातील चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ते द्वारकेतील समुद्राच्या खोलीपर्यंत, त्यांनी वारसा आणि विज्ञानाला वैभव मिळवून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारत आज अंतराळ क्षेत्रात नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. स्वदेशी कोविड लसी, स्वदेशी संरक्षण प्रणाली, स्टार्टअप्स, नवोन्मेष, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यापासून ते उत्पादन मोहिमेपर्यंत, मोदी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी भारताची निर्मिती करत आहेत. PM Modi
Sharad Pawar appreciates PM Modi’s capable guidance, wishes him on his birthday
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!