शरद पवारही म्हणले होते जय कर्नाटक मग काय त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

शरद पवारही म्हणले होते जय कर्नाटक मग काय त्यांचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

पुणे : गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका कार्यक्रमात जय गुजरात अशी घोषणा देण्यात आली होती. यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एका कार्यक्रमात जय कर्नाटक अशी घोषणा केली होतीअशी आठवण करून देत त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम नाही असे म्हणायचे का असा सवालही त्यांनी केला. (S

पुण्यात जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपताना शिंदे यांनी धन्यवाद, जय महाराष्ट्र म्हटले आणि निघत असताना जय गुजरात असा नारा दिला. यावरून शिंदे यांच्यावर टीका सुरु झाली आहे.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला आठवण करून देतो कि चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उदघाटन करताना माननीय शरद पवार जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते, याचा अर्थ कर्नाटकवर त्यांचे जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर नाही असा आहे का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यांच्याविषयी आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यावर जय गुजरात असे म्हटले म्हणून एकनाथ शिंदे यांचे गुजरातवर प्रेम वाढले आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झाले असे नाही.

इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे. मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केले आहे. मोगली सत्ता घालविण्याचे आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकविण्याचे का मराठी माणसाने केले आहे. त्यामुळे एवढा संकुचित विचार कोणी करत असेल तर चुकीचा आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे.

Sharad Pawar had also said Jai Karnataka, so has his love for Maharashtra decreased? Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023