विशेष प्रतिनिधी
सातारा : शरद पवार हे इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसले आहेत. जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, भेट देणारे शरद पवार आज ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा काढत आहेत, असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
साताऱ्यात बोलताना हाके म्हणाले, निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात केलेला हा नेता आहे. शरद पवारांची ओळखच दगाबाज नेता ही आहे. सांगायचे एक आणि करायचं एक असे शरद पवार आहेत. ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात. जरांगे नावाच्या बबड्याला फिरवणारे त्याचे आंदोलन उभं करणारे अशी शरद पवार यांची ओळख आहे. आज तेच ओबीसींच्या बाजूने मंडल यात्रा सुरू करत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
जरांगे पाटील यांनी लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसींचे पंचायत राजमधील आरक्षण असो किंवा शिक्षण क्षेत्रातील आरक्षण असो, सगळे उद्ध्वस्त केले आहे. या मंडल यात्रेमागचा नेमका उद्देश काय आहे. मंडल आयोगाच्या 38 योजनांपैकी दोन योजना भारतीय व्यवस्थेत लागू झाल्या आहेत. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्र ओरखडून खाल्ला जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणाला किंमत दिली नाही. इच्छाधारी नागाप्रमाणे शरद पवार वेटोळे घालून बसले आहेत, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.
ओबीसींमध्ये फुट कशी पाडायची, फोडा आणि जोडा हे शरद पवार यांचे राजकारण आहे. शरद पवार ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागतात. महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचं अंतकरण समजून घ्यायला हवं होतं. त्यांनी निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजून घेतले आहे. शरद पवार हे दगेबाज नेते आहेत, अशी टीकाही हाके यांनी केली. तसेच अशा दगाबाज नेत्यांना खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन हाके यांनी ओबीसी समाजाला केले.
Sharad Pawar is sitting in a coil like a wishful serpent, Laxman Hake’s attack
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला