विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Sharad Pawar पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा येत आहेत. मात्र, विराेधकांकडून माेदींच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र, 75 वयानंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं मी म्हणू शकत नाही. मला बोलायचा नैतिक अधिकार नाही, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस साजरा केला. मात्र गेल्या वर्षभरापासून विरोधकांकडून मोदींच्या निवृत्तीबाबत प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा 75 वर्षांचा निवृत्तीचा नियम नरेंद्र मोदींना लागू होत नाही का? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. Sharad Pawar
यावर पवार (Sharad Pawar) म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 75 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन आणि समाधान व्यक्त केलं आहे. मी देखील त्यांना पत्र लिहिलं आणि ट्वीट करत त्यांचं अभिनंदन केलं. अशा प्रसंगी कुठलंही राजकारण न आणता संस्कृतपणाचा दर्शन दाखवल पाहिजे. देशातील किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने मोदींचं अभिनंदन केलं आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नरेंद्र मोदींना अवतारपुरुष म्हटले आहे. यावर शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींना अवतारपुरुष म्हणण्याच्या गोष्टी मला समजत नाही. कारण माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. त्यावेळी वयाच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, त्यामुळे आम्हीही आणत नाही. देशासाठी काय करायचं असेल तर त्यांनी ते कराव एवढीच अपेक्षा आहे.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त कालच्या पेपरमध्ये शिंदेची जाहीरात पहिल्या पानावर दिसली. जाहिरात देऊन एकनाथ शिंदे भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे का? अशा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, पेपरच्या काही समस्या असतात. संबंध पान जाहीरात मिळाली तर आनंद असतो. एकना शिंदे यांनी मोदींबद्दल आत्मियता दाखवली.
Sharad Pawar said, I have no moral right to talk about Modi’s retirement
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!